Skip to main content

पेडलवारी २०२३ - परेश खानविलकर

 पुण्यात आल्यापासून मी वारीसोबत चालण्यासाठी आवर्जून १ दिवस राखून ठेवतो. मग पुण्यातच काही किलोमीटरपुरतीच मर्यादित वारी करण्यापेक्षा एका दिवसात सायकलने पुणे ते पंढरपूर पुर्ण वारी करायला पाहीजे, हा विचार गेल्या २-३ वर्षांपासून डोक्यात घोळत होता. अखेर यावर्षी तो योग जुळून आलाच. 

केवळ एक तासाची झोप आणि तळपत्या उन्हाच्या तडाख्यात राईड पूर्ण होईल का? याची थोडी धाकधूक वाटत होती, परंतु रणरणत्या उन्हात विठूरायाच्या कृपेची सावली सोबत असल्याने राईड नक्की पूर्ण होईल हा आत्मविश्वास ही होता , आणि तसं झालंही…

आयोजकांनी केलेल्या चोख आणि उत्तम व्यवस्थेमुळे भाजून काढणारया उन्हात ही पहिले १८५ किलोमीटर पार करणे सुसह्य झाले. 

पण जसं आम्ही सोलापूर हायवे सोडून पंढरपूर फाट्याला वळलो तसा रस्ता ही बदलला आणि वाऱ्याची दिशा ही.. 

आतापर्यंत मागून असलेला वारा समोरुन आणि उजव्या बाजूने वाहू लागला. मग सायकलचे गियर्स ही बदलू लागले आणि गती ही. 

साधारण २-३ किलोमीटर सायकल चालवल्यानंतर पुढे एक-एक किलोमीटरचं अंतर कापणं ही अवघड वाटू लागलं, पंढरपूर तर अजून ३५ किलोमीटर लांब होतं. एव्हाना उन्हाची तीव्रता कमी झाली असली तरी समोरुन येणाऱ्या वाऱ्याचा वेग मात्र वाढला होता. 

अशा वेळी विशेषतः शरीर थकलेलं असताना वाऱ्याच्या झोताला चिरून सायकलला आणि स्वतःला पुढे ढकलत राहण्यासाठी आत्यंतिक गरज होती ती कमालीचं स्वयंप्रेरित असण्याची... 

"बस, आता थोडंसच अंतर राहिलंय, मग झालंच!" हे सतत स्वतःला सांगत राहण्याची... 

आणि इथूनच माझा  "प्रवास आत्मसंवादाचा" सुरु झाला,असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. 

बाहेर वाऱ्याशी आणि आत स्वतःशीच झगडत जेव्हा शेवटचा २० किलोमीटरचा टप्पा ओलांडून पंढरपूरात पोचलो तेव्हा मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ माजला होता. ठरवलेलं साध्य झालं होतं... 

काही कार्यसिध्दी केल्यावर, "चक्क, आपण हे करू शकलो?" म्हणून स्वतःलाच अवाक करणाऱ्या असतात, तर काही "आटोपलं , बाबा एकदाचं " म्हणून सुटकेचा निश्वास टाकणाऱ्या असतात... 

काही कामगिऱ्या फत्ते केल्या की कधी आपल्याला स्वतःच स्वतःचा अभिमान वाटतो तर कधी दुसऱ्याना आपला... 

काही यशप्राप्ती आत्मविश्वास वाढवितात तर काही प्रगल्भता...

काही मैलाचे दगड पार केल्यावर कधी निखळ आनंद मिळतो तर कधी आत्मसुख आणि समाधान... 

पण काही मोजक्या ध्येयपूर्तता अशा असतात, ज्या या सर्वांची संयुक्त अनुभूती देतात, 

ही सायकलवारी त्यापैकी एक...

विद्येचे माहेरघर (पुणे) ते संतांचे माहेरघर (पंढरपूर) - २२६ किलोमीटरचा प्रवास…

पहिली सायकलवारी, विठ्ठल-रखुमाईच्या चरणी अर्पण… 

ता. क. - "प्रवास आत्मसंवादाचा" हे या वर्षीच्या सायकलवारीचं घोषवाक्य होतं.



Comments

Popular posts from this blog

Photo of the week - 23/Jun/25 - 29/Jun/25

 Theme: Greenery / Monsoon Flowers Special Mentions

पेडलवारी २०२३ - सचिन गुल्हाणे

सायकल वारी -ओढ पांडुरंगाची खर तर सायकल वारी करण्याची इच्छा बरेच वर्ष होती, २ उद्दिष्ठ होती माऊलीचे एक वेगळ्या प्रकारे दर्शन घेणे  आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करणं बरीच आव्हान आणि समस्या असणार होत्या, राईडच्या अगोदर घरून परवानगी ( खरंच) मिळवणं मोठ आव्हान होत, ऑफिस वेळ सांभाळता मोठया राईड चा सराव झाला नव्हता आणि मुख्य म्हणजे दुपारी उनात राईड करण्याचा सराव अगदीच नव्हता... फक्त एकच जमेची बाजू होती,  माऊलीच्या दर्शनासाठी सायकल ने जाणे ही प्रबळ इच्छाशक्ती .  सोबतच्या ४ मित्रांना जे नेहमीचे सायकलपटू नाहीत त्यांना पण पटवून राईड ला घेऊन जाणार होतो, त्याच एक वेगळच दडपण होत. निघायच्या २ दिवस आधी त्यातील २ लोकांनी व्ययक्तिक कारणांनी नकार दिला आणि दडपण अजूनच वाढले, श्री आणि सौ राठोड नेहमी प्रमाणे उत्साहात तयार होते. आधल्या दिवशी बॅग ड्रॉप साठी मी सारंग ला माझे घर सूचित केले होते, बऱ्याच लोकांना ते माहिती असल्यामुळे मदत होईल हा त्यामागचा उद्देश. संध्याकाळचे कॉल्स थोडे उशिरा घेत ४२ बॅग्स जमा केल्या आणि अद्वैत च्या गाडीत व्यवस्थित लावल्या. यात खरा तर अपेक...

पेडलवारी २०२३ - राजीव अक्षय आणि रणबीर

Dream come true! Sharing a dream come true incident from our cycle wari. सायकल वारी करत पंढरपूरला जायचं म्हणजे सगळं लक्ष दोनशे किलोमीटर पेक्षा जास्त सायकल कशी चालेल, काय होईल ह्याचाच वर लक्ष केंद्रित होत। पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन पण घ्यायचे हे पण अर्थात मनात होतच।  सायकलची वारी पूर्ण केल्यानंतर, रात्रीचे जेवण झाल्यानंतर आणि सायकल डिपॉझिट केल्यानंतर साधारण रात्रीचे साडेदहा झाले होते, आणि आम्ही विचार केला की देवळात दर्शनाला आत्ताच जाऊ।  भक्त निवासातून निघताना कोणी सांगितलं की देऊळ आता बंद झाला असेल, पण अक्षय म्हणायला नाही आत्ताच जाऊया आणि आम्ही गेलो।  मंदिराच्या बोळीत शिरल्यानंतर एकाने सांगितलं की मंदिर आता बंद झाला आहे दर्शन होणार नाही, तरी आम्ही मंदिरापर्यंत गेलो आणि बाहेरूनच नमस्कार केला।  त्यानंतर आम्ही मंदिराची प्रदक्षिणा घालायचा विचार केला आणि प्रदक्षिणा घालताना बाहेर एक फुलवाला म्हणायला की साहेब दर्शन चालू आहे आत्ताच लगेच जाऊन या।  आम्ही संधीचा सदुपयोग करून लगेच गेलो आणि आम्हाला चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात जायचा आणि विठोबाच्या चरणी डोकं ठेवायचा once in a...