दररोज स्वतःशीच हरून हरून कंटाळा आला होता. झोपताना मोठं मोठे प्लॅन ठरवायचे , गजर लावायचा आणि सकाळी वेळ झाली की सगळं बंद करून गप्प झोपायच. अश्या वेळी कारणं पण फार भारी सुचतात, मन व्यवस्थित गंडवत आपल्याला. काल खूपच काम झालंय, आजचा दिवस करू आराम त्यात काय एवढं, शरीराला झोप पण महत्त्वाची आहे की, संध्याकाळी करू व्यायाम वगैरे. पण जेव्हा कधी जाग येते तेव्हा व्यवस्थित सगळ्या गोष्टींना उशीर झालेला असतो आणि सगळ्यात वाईट वाटतं ते स्वतःशीच हरल्याच. मग पूर्ण दिवस ती बेचैनी , मन खात अगदी, "अरे काय चाललंय". दोन दोन सायकल उभ्या आहेत, रानिंग ची शॉर्ट आहे shoes आहेत आणि आपण साधं लवकर उठू शकत नाही. मग हा स्वतावरचा राग सगळीकडे दिसतो. त्यात भर म्हणजे ग्रुप वर येणारे राईड चे फोटो... ते अजुनच जळवतात 😂. मग एक एक गोष्ट सोडून द्यावी वाटते, सायकल विकून टाकावी वाटते वगैरे. पंढरपूर सायकल वारी नंतर सगळं भारी चालू होत पण काही कारणाने राईड थांबल्या आणि नंतर आजारी पण पडलो. सगळं करून बघितलं, दोन दोन गजर लावणे, कुणाला तरी सांगून ठेवणे राईड साठी, झोपताना उशा जवळ जर्सी, लाईट वगैरे सगळी तयारी करून ठेवली . पण पूर...