सायकल वारी -ओढ पांडुरंगाची खर तर सायकल वारी करण्याची इच्छा बरेच वर्ष होती, २ उद्दिष्ठ होती माऊलीचे एक वेगळ्या प्रकारे दर्शन घेणे आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करणं बरीच आव्हान आणि समस्या असणार होत्या, राईडच्या अगोदर घरून परवानगी ( खरंच) मिळवणं मोठ आव्हान होत, ऑफिस वेळ सांभाळता मोठया राईड चा सराव झाला नव्हता आणि मुख्य म्हणजे दुपारी उनात राईड करण्याचा सराव अगदीच नव्हता... फक्त एकच जमेची बाजू होती, माऊलीच्या दर्शनासाठी सायकल ने जाणे ही प्रबळ इच्छाशक्ती . सोबतच्या ४ मित्रांना जे नेहमीचे सायकलपटू नाहीत त्यांना पण पटवून राईड ला घेऊन जाणार होतो, त्याच एक वेगळच दडपण होत. निघायच्या २ दिवस आधी त्यातील २ लोकांनी व्ययक्तिक कारणांनी नकार दिला आणि दडपण अजूनच वाढले, श्री आणि सौ राठोड नेहमी प्रमाणे उत्साहात तयार होते. आधल्या दिवशी बॅग ड्रॉप साठी मी सारंग ला माझे घर सूचित केले होते, बऱ्याच लोकांना ते माहिती असल्यामुळे मदत होईल हा त्यामागचा उद्देश. संध्याकाळचे कॉल्स थोडे उशिरा घेत ४२ बॅग्स जमा केल्या आणि अद्वैत च्या गाडीत व्यवस्थित लावल्या. यात खरा तर अपेक...