Skip to main content

आज मी थोडा जिंकलो... - विशाल गुरव

दररोज स्वतःशीच हरून हरून कंटाळा आला होता. झोपताना मोठं मोठे प्लॅन ठरवायचे , गजर लावायचा आणि सकाळी वेळ झाली की सगळं बंद करून गप्प झोपायच. अश्या वेळी कारणं पण फार भारी सुचतात, मन व्यवस्थित गंडवत आपल्याला. काल खूपच काम झालंय, आजचा दिवस करू आराम त्यात काय एवढं, शरीराला झोप पण महत्त्वाची आहे की, संध्याकाळी करू व्यायाम वगैरे. 

पण जेव्हा कधी जाग येते तेव्हा व्यवस्थित सगळ्या गोष्टींना उशीर झालेला असतो आणि सगळ्यात वाईट वाटतं ते स्वतःशीच हरल्याच. मग पूर्ण दिवस ती बेचैनी , मन खात अगदी, "अरे काय चाललंय". दोन दोन सायकल उभ्या आहेत, रानिंग ची शॉर्ट आहे shoes आहेत आणि आपण साधं लवकर उठू शकत नाही. मग हा स्वतावरचा राग सगळीकडे दिसतो. त्यात भर म्हणजे ग्रुप वर येणारे राईड चे फोटो... ते अजुनच जळवतात 😂. मग एक एक गोष्ट सोडून द्यावी वाटते, सायकल विकून टाकावी वाटते वगैरे.

पंढरपूर सायकल वारी नंतर सगळं भारी चालू होत पण काही कारणाने राईड थांबल्या आणि नंतर आजारी पण पडलो. सगळं करून बघितलं, दोन दोन गजर लावणे, कुणाला तरी सांगून ठेवणे राईड साठी, झोपताना उशा जवळ जर्सी, लाईट वगैरे सगळी तयारी करून ठेवली . पण पूर्ण व्यर्थ, सकाळी गजर वाजयाच्या आत जाग येते आणि मग पटकन व्हॉट्स ऍप बघून, नाव कॅन्सल करून गजर बंद केला जातो. काही वेळा तर ज्यांच्या बरोबर जाणार असतो ते पण कॅन्सल झालेले असतात मग काय भारी. 

अश्यावेळी गरज असते काहीतरी मोटिवेशन ची. मागच्या शनिवारी आणि रविवारी सातारा हील marathon बघितली, एक वेगळीच ऊर्जा होती. खूप भारी भारी लोकं भेटले आणि वाटलं साला करूयात आपण पण सुरू परत. माघारी आल्या आल्या जशी होईल तशी सुरुवात केली . पहिल्या दिवशी ५ किमी चाललो, दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा का होईना उठून योगा केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी परत ५ किमी चाललो आणि आज finally cycle बाहेर काढली... 

मला आज बाहेर पडायचं होत आणि ग्रुपवर नेमकी राईड नाही. पण सुजितने कात्रज घाट राईड पोस्ट केली तेव्हा वाटलं नाव द्यावं का नको पण नाव टाकलं. नेमका काही कामामुळे झोपायला उशीर झाला, चांगलं कारण होत सकाळी न उठायला पण आता हरून हरून कंटाळा आला होता... 

आज पण गजरच्या आधीच जाग आली, पण आज स्वतःला ठामपणे उभ केलं आणि ५.४५ ला बाहेर पडलो.

काय मस्त वाटलं, सुजित असल्यामुळे ताकद चांगलीच पणाला लागली आणि मस्त २५ किमी ची राईड मारून आलो.

आज खूप छान वाटतंय ... स्वतःशीच थोड जिंकलो आहे ... आता शर्यत आहे असच जिंकत राहण्याची... रोज.. थोडं थोडं…

मला माहित आहे आपल्यातले खूप जण अश्या परिस्थिती मधून जात असणार म्हणूनच इथे पाठवत आहे... चला दररोज थोड थोड जिंकूया स्वतःशी.... एकमेकांना मदत करत... 


--

विशाल गुरव 😊

Comments

Popular posts from this blog

Photo of the week - 23/Jun/25 - 29/Jun/25

 Theme: Greenery / Monsoon Flowers Special Mentions

पेडलवारी २०२३ - सचिन गुल्हाणे

सायकल वारी -ओढ पांडुरंगाची खर तर सायकल वारी करण्याची इच्छा बरेच वर्ष होती, २ उद्दिष्ठ होती माऊलीचे एक वेगळ्या प्रकारे दर्शन घेणे  आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करणं बरीच आव्हान आणि समस्या असणार होत्या, राईडच्या अगोदर घरून परवानगी ( खरंच) मिळवणं मोठ आव्हान होत, ऑफिस वेळ सांभाळता मोठया राईड चा सराव झाला नव्हता आणि मुख्य म्हणजे दुपारी उनात राईड करण्याचा सराव अगदीच नव्हता... फक्त एकच जमेची बाजू होती,  माऊलीच्या दर्शनासाठी सायकल ने जाणे ही प्रबळ इच्छाशक्ती .  सोबतच्या ४ मित्रांना जे नेहमीचे सायकलपटू नाहीत त्यांना पण पटवून राईड ला घेऊन जाणार होतो, त्याच एक वेगळच दडपण होत. निघायच्या २ दिवस आधी त्यातील २ लोकांनी व्ययक्तिक कारणांनी नकार दिला आणि दडपण अजूनच वाढले, श्री आणि सौ राठोड नेहमी प्रमाणे उत्साहात तयार होते. आधल्या दिवशी बॅग ड्रॉप साठी मी सारंग ला माझे घर सूचित केले होते, बऱ्याच लोकांना ते माहिती असल्यामुळे मदत होईल हा त्यामागचा उद्देश. संध्याकाळचे कॉल्स थोडे उशिरा घेत ४२ बॅग्स जमा केल्या आणि अद्वैत च्या गाडीत व्यवस्थित लावल्या. यात खरा तर अपेक...

पेडलवारी २०२३ - राजीव अक्षय आणि रणबीर

Dream come true! Sharing a dream come true incident from our cycle wari. सायकल वारी करत पंढरपूरला जायचं म्हणजे सगळं लक्ष दोनशे किलोमीटर पेक्षा जास्त सायकल कशी चालेल, काय होईल ह्याचाच वर लक्ष केंद्रित होत। पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन पण घ्यायचे हे पण अर्थात मनात होतच।  सायकलची वारी पूर्ण केल्यानंतर, रात्रीचे जेवण झाल्यानंतर आणि सायकल डिपॉझिट केल्यानंतर साधारण रात्रीचे साडेदहा झाले होते, आणि आम्ही विचार केला की देवळात दर्शनाला आत्ताच जाऊ।  भक्त निवासातून निघताना कोणी सांगितलं की देऊळ आता बंद झाला असेल, पण अक्षय म्हणायला नाही आत्ताच जाऊया आणि आम्ही गेलो।  मंदिराच्या बोळीत शिरल्यानंतर एकाने सांगितलं की मंदिर आता बंद झाला आहे दर्शन होणार नाही, तरी आम्ही मंदिरापर्यंत गेलो आणि बाहेरूनच नमस्कार केला।  त्यानंतर आम्ही मंदिराची प्रदक्षिणा घालायचा विचार केला आणि प्रदक्षिणा घालताना बाहेर एक फुलवाला म्हणायला की साहेब दर्शन चालू आहे आत्ताच लगेच जाऊन या।  आम्ही संधीचा सदुपयोग करून लगेच गेलो आणि आम्हाला चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात जायचा आणि विठोबाच्या चरणी डोकं ठेवायचा once in a...