Skip to main content

पेडलवारी २०२३ - राजीव अक्षय आणि रणबीर

Dream come true!

Sharing a dream come true incident from our cycle wari.

सायकल वारी करत पंढरपूरला जायचं म्हणजे सगळं लक्ष दोनशे किलोमीटर पेक्षा जास्त सायकल कशी चालेल, काय होईल ह्याचाच वर लक्ष केंद्रित होत। पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन पण घ्यायचे हे पण अर्थात मनात होतच। 

सायकलची वारी पूर्ण केल्यानंतर, रात्रीचे जेवण झाल्यानंतर आणि सायकल डिपॉझिट केल्यानंतर साधारण रात्रीचे साडेदहा झाले होते, आणि आम्ही विचार केला की देवळात दर्शनाला आत्ताच जाऊ। 

भक्त निवासातून निघताना कोणी सांगितलं की देऊळ आता बंद झाला असेल, पण अक्षय म्हणायला नाही आत्ताच जाऊया आणि आम्ही गेलो। 

मंदिराच्या बोळीत शिरल्यानंतर एकाने सांगितलं की मंदिर आता बंद झाला आहे दर्शन होणार नाही, तरी आम्ही मंदिरापर्यंत गेलो आणि बाहेरूनच नमस्कार केला। 

त्यानंतर आम्ही मंदिराची प्रदक्षिणा घालायचा विचार केला आणि प्रदक्षिणा घालताना बाहेर एक फुलवाला म्हणायला की साहेब दर्शन चालू आहे आत्ताच लगेच जाऊन या। 

आम्ही संधीचा सदुपयोग करून लगेच गेलो आणि आम्हाला चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात जायचा आणि विठोबाच्या चरणी डोकं ठेवायचा once in a लाईफ टाईम चान्स मिळाला। 

गर्दी पण कमी असल्यामुळे ते त्यांच्या शिपायाने काही जास्त घाई केली नाही। 

रांगेत माझ्या तीन-चार लोकांपुढे एक पुरुष ढसाढसा रडला आणि म्हणायला पांडुरंगा माझं भाग्य एवढे चांगला आहेका की मला तुझे दर्शन झाले। 

त्यावेळेस मला लक्षात आलं की माझं भाग्य खूपच चांगला आहे आणि मला असे दर्शन सायकलवारीमुळे लाभले।




Comments