Skip to main content

पेडलवारी २०२३ - विनोद रांजणे

अविश्वसनीय!!!

 🙏सायकल वर पुणे ते पंढरपूर जाऊन मला काही वेळ खरंच वाटत नव्हते.🙏

कारण या अगोदर मी जास्तीत जास्त 120 ते 125 पर्यंतचं सायकल ride केली होती. त्याचवेळेस मला नकॊ नकॊ झाले होते. त्यामुळे मी 220 km ची सायकलवारी पूर्ण करू शकतो याचा लांब लांब कोठे विचारही नव्हता.

पण आरती ताईंनी मला पेडलवाली ग्रुपमध्ये ऍंड केले.

आणि मी पहिल्यांदा पेडलवाली ग्रुपबरोबर ride करायला सुरवात केली. पहिली ride ही माझी पुणे ते भुलेश्वर होती.

पहिली ride आणि पहिला दिवस मला सुरवातीलाच 10 मिनिट late झाला होता. अनंत कुलकर्णी सरांना फोन केला तर ते ग्रुपबरोबर पुढे पोचले होते. पण ते पुढे माझ्यासाठी एकटेच थांबले होते. तसे आम्ही एकमेकाला पाहिलेही नव्हते कधी. आणि ग्रुप हडपसरला थांबला होता. आणि आम्ही एकत्र भुलेश्वरला निघालो. या वेळी पौर्णिमा ताई भुलेश्वर चा घाट चढतांना पाहून मला खूप प्रेरणा मिळाली. नाहीतर यामध्ये मी उन्हामुळे नांगी टाकली होती. मला या ride मधेच खूप गोष्टी जाणवल्या आणि मला शाळेतील एक गोष्ट आठवली "एकी हेच बळ".

सर्वजण ग्रुपमध्ये राहणे.

कोणाचा प्रॉब्लेम असेल तर थांबणे आणि एकत्र येऊन तो सॉल्व करणे.

ग्रुप मॅनेजमेंट.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वय कोणाचे कितीही असले तरी जोश मात्र एकच.


माझे आजोबा हे नेहमी पंढरपूरची पायी वारी करायचे.

खर तर त्यांना मी पाहिले पण नाही.

पण आज्जीपासून बऱ्याच वेळा वेग वेगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या त्यांच्याबद्दल. काशी, त्रंबकेश्वर, आणि पंढरपूर इत्यादी.

म्हणून मी मनात ठरवले होते कि आपण atleast पुणे ते सासवडवारी चालू करायची पण वेळे अभावी तेवढे पण मागील 5 ते 6 वर्षात जमले नाही. पण जेव्हा सायकल pedalvali ग्रुप जॉईन केला आणि 15 दिवस प्रॅक्टिस केली तेव्हा मला असे वाटले कदाचित मी जाऊ शकतो.

आणि कॉन्फिडन्स नसताना पुणे ते पंढरपूर सायकल वारी रजिस्ट्रेशन केले.

जशी जशी प्रॅक्टिस चालू होती तसा माझा कॉन्फिडन्स वाढत होता. पण अचानक आवश्यक कामामुळे मी 5 दिवस सायकलिंग केली नव्हती. कामाचा लोड खूपच होता. मनात तर पंढरपूर वारी करायचे ठरवले होते. त्यात माझा मित्र आनंद 3 तारखेला पंढरपूर सायकल वारी करून आला होता. त्याने सांगितले होते कि खूपच ऊन असते आणि तुझा विक पॉईंट आहे ऊन. परत जायचे का नाही मनात होकार नकार दोन्ही विचार यायला लागले. शेवटचे 3 दिवस बाकी होते छोटया छोटया प्रॅक्टिस rides चालू होत्या. आणि मिटिंगचा दिवस माझासाठी खूप महत्वाचा ठरला मी अगदी जाणारच असा विचार करायला लागलो. 

10 तारखेला पहाटे 2.15 ला  मी घराबाहेर पडलो. एका बाजूला बॅगेज आणि अंगावर सॅक घेऊन मी सवारी चालू केली. बॅगेज हे मला सारस बागे पर्यंत घेऊन जायचे होते. कात्रज - कोंढवा रोडला खूपच अंधार असतो त्यात मला कुत्ते गँगची खूपच भीती वाटते. त्यात ब्रिजवर एका साईडला काम चालू असल्याने मला जाताना ब्रिज खालून जाण्याचे खूप टेन्शन होते. म्हणून मी रॉंग वेने ब्रिज वरून निघालो मधेच दोन ट्रक अंगावर आले पण एका बाजूने कसा तरी कात्रज चौकात आलो. मी सायकल जोरात मारू लागलो अगदी बालाजीनगर चा ब्रिज उतरून खाली आलो.

 अचानक जी भीती होती तेच झाले, सहा ते सात कुत्री माझ्या सायकलकडे धावून आली मला काहीच कळत नव्हते मी ओरडलो तरी ते अगदी आता माझा पाय पकडणारच मग मी सायकल खूपच जोरात मारू लागलो. जसे काय त्यांना त्यांची शिकार सापडली होती. जवळपास एक किलोमीटर ते माझा पाठलाग करत होते. कदाचित त्यांना ती हॅण्डल ला अडकवलेली बॅग, पाठीवर लावलेली सॅक आणि हेल्मेट पाहून मी चोरी करणारा म्होरक्या वाटलो असं वाटतय. नक्की मला काहीच कळाले नाही पण माझी राहिलेली प्रॅक्टिस मात्र यांनी नक्कीच करून घेतली. का त्यांना सांगायचे होते ये तू जाऊ नकॊस तुझे काम नाही वारी पूर्ण करण्याचे?

3.15 वाजले होते मी बॅग ट्रक मध्ये दिली होती मला कळत नव्हते पेडलवाली ग्रुप नक्की पुढे गेला कि नाही. मी मिलिंद सरांना बरोबर निघालो अंधार असल्याने एवढे काय वाटत नव्हते सुरवात असल्याने जोश होता. आम्ही हडपसर सोडले, काही वेळाने आम्ही थेउर सोडून यवत च्या दिशेने निघालो, काही वेळाने आमचा nasta पॉईंट आला. क्या बात है सगळे सायकलिस्ट एका जागेवर पाहिल्यावर काय मस्त वाटत होते. आणि विशेष म्हणजे पेडलवाली फॅमिली ही तिथे दिसली. पुढे आम्ही एकत्र वारी चालू केली. 20-25 km वर hydration पॉईंट केले होते खूप छान सोय केली होती. पण ते 20-25 km पण मला जास्त वाटायचे. पाटस नंतर घाट चालू झाला ऊन हळू हळू चांगले रंग दाखवत होते. कसा तरी तो घाट पूर्ण केला आणि पुढे आम्ही वारी चालू केली 100 km पूर्ण झाले होते. रख रख ऊन लागत होते आजून 55-60 km पुढे जायचे होते. 125 km चा माझा कोठा संपवला होता यापूर्वी मी कधीच 125 km सायकलिंग केले नव्हते. पण मनापासून सांगतो मी ठरवले आता इंदापूर पर्यंत कसे तरी जायचे आणि लंच झाल्यावर 2/3 तास आराम करायचा. कारण एवढे चढ उतार होते कि जेवढे संपतील तेवढे कमीच होते. पण प्रेरणा ताईने कसे तरी फोर्स करून करून मी कसा तरी एकदाचा हॉटेल वर पोचलो. हॉटेल वर आल्यावर ते सगळे सायकलिस्ट पाहून खूपच भारी वाटत होते. 

जेवण झाल्यावर कोठे तरी मस्त आराम करु असे वाटत होते पण तशी जागा ही नव्हती आणि सगळे हळू हळू सायकल घेऊन निघाले. त्यावेळेस मी दोन तीन अश्या हस्ती पहिल्या कि मनात मी परत वारी पूर्ण करण्याच्या निर्णय घेतला आणि ट्रक बघण्याचा विषय सोडून दिला. पुढे जाताना प्रेरणाताई मला फुल जोश आणत तू करु शकतो, तू नक्की जाणार, आता ढग आलेत, ऊन गेले असे म्हणत म्हणत आम्ही उजनी धरण पर्यंत पोचलो. तिथे गेल्यावर आम्ही फोटो काढले. मंगेश दादाला थोडा त्रास होत होता आम्ही थोडा वेळ थांबलो आणि निघालो. तिथून पुढे मी, मंगेश दादा आणि श्रीरंग दादा हळू हळू पुढे निघालो. कसे तरी आम्ही पंढरपूर फाट्यापर्यंत पोचलो होतो. मला पुढची ride अशक्य वाटत होती.

पण फक्त 40 km राहिलेले होते म्हणून मी चढ कधी संपेल याची वाट बघत होतो. पण मला माहिती नव्हते कि हा पूर्ण चढ आहे.

मला आता 10-10km जाणे ही शक्य नव्हते मी सारखा सारखा थांबत होतो कारण चढ आणि चढच, उतार कधीच नव्हता.

मला असे वाटू लागले कि माझ्या आयुष्यातले सगळे चढ आजच पूर्ण करायचे आहेत.

पण माऊलींचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत असल्याने मी हार 

मानत नव्हतो. मनात मला असे वाटायचे कि मला काहीतरी त्रास होणारच. ऊन कमी कमी होत होते आणि km पण कमी कमी होत होते. 

मंगेश दादा आणि श्रीरंग दादा माझ्यासाठी थांबत होते. त्यांच्या मूळे मी राहिलेले km पूर्ण करु शकलो आणि आम्ही पंढरपूरामध्ये पोचलो होतो माऊलींची मोठी मूर्ती पाहून माझे डोळे पाण्याने भरून आले होते. नंतर कळाले मंदिर आजून 3/4 km लांब आहे एकदाचे आम्ही हॉटेल वर पोचलो आणि मी शुटकेचा श्वास घेतला. मला खरच वाटत नव्हते कि मी पुणे ते पंढरपूर सायकल वारी पूर्ण केली आहे. पण तो आनंद हा न सांगण्यासारखा होता. पहाटे उठून आम्ही माऊलींचे दर्शन घेतले. खूप आणि खूपच मन प्रसन्न झाले एवढ्या लवकर उठून आमचे दर्शन होईल असे वाटलेही नव्हते. 

हे सगळे क्रेडिट मी पेडलवाली ग्रुपला देतो...

सॉरी हा ग्रुप नसून पेडलवाली फॅमिली आहे...

मनापासून धन्यवाद

मॅनेजमेम्ट टीम
आरती ताई
सारंग भिडे सर
अनंत सर
प्रेरणा ताई
प्रसाद सर
मंगेश दादा
श्रीरंग दादा
आणि ऑल पेडलवाली फॅमिली 🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

Photo of the week - 23/Jun/25 - 29/Jun/25

 Theme: Greenery / Monsoon Flowers Special Mentions

पेडलवारी २०२३ - सचिन गुल्हाणे

सायकल वारी -ओढ पांडुरंगाची खर तर सायकल वारी करण्याची इच्छा बरेच वर्ष होती, २ उद्दिष्ठ होती माऊलीचे एक वेगळ्या प्रकारे दर्शन घेणे  आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करणं बरीच आव्हान आणि समस्या असणार होत्या, राईडच्या अगोदर घरून परवानगी ( खरंच) मिळवणं मोठ आव्हान होत, ऑफिस वेळ सांभाळता मोठया राईड चा सराव झाला नव्हता आणि मुख्य म्हणजे दुपारी उनात राईड करण्याचा सराव अगदीच नव्हता... फक्त एकच जमेची बाजू होती,  माऊलीच्या दर्शनासाठी सायकल ने जाणे ही प्रबळ इच्छाशक्ती .  सोबतच्या ४ मित्रांना जे नेहमीचे सायकलपटू नाहीत त्यांना पण पटवून राईड ला घेऊन जाणार होतो, त्याच एक वेगळच दडपण होत. निघायच्या २ दिवस आधी त्यातील २ लोकांनी व्ययक्तिक कारणांनी नकार दिला आणि दडपण अजूनच वाढले, श्री आणि सौ राठोड नेहमी प्रमाणे उत्साहात तयार होते. आधल्या दिवशी बॅग ड्रॉप साठी मी सारंग ला माझे घर सूचित केले होते, बऱ्याच लोकांना ते माहिती असल्यामुळे मदत होईल हा त्यामागचा उद्देश. संध्याकाळचे कॉल्स थोडे उशिरा घेत ४२ बॅग्स जमा केल्या आणि अद्वैत च्या गाडीत व्यवस्थित लावल्या. यात खरा तर अपेक...

Photo of the week - 05/May/25 - 11/May/25

Theme: Monuments, Historical Sites Special Mention