Skip to main content

पेडलवारी २०२३ - वारीतले भारी लोक - २ - शमिता वागळे

 वारीतले भारी लोक

 क्रमांक २- शमिता


संथ वाहते कृष्णामाई, 

तिरावरल्या सुख दुःखाची जाणिव तिजला नाही...

 

अगदी अशीच आमची शमिता, सुख दुःखाच्या परे, तर पेडलवालीची ही कृष्णामाई आहे , शमिता.

अतिशय शांत, धीर गंभीर पण तितकीच महत्वाकांक्षी, निर्भिड..

एक समान स्पीड, आपले आपले सायकलिंग बरे, आणि आपण बरे.

आपल्या grp मध्ये खूप बोलकी लोकं आहेत, पण एक स्त्री असून अबोल राहून आपल्या सायकलिंगची चाके चालवून दाखवणारी शमिता काही ओरच आहे..

 ३५ वर्षानंतर सायकल चालवणे सोप्पे नाही... पण आपल्या सोबत तिने हा विडा उचलला आणि पूर्णतः सार्थ केला..

कायम चेहऱ्यावर एक सुंदर हसू, कोणीही भेटले तरी same प्रेमाचा भाव, 

वयाच्या ५६ व्या वर्षी इतकं strong 💪 राहून केलेला 

पुणे पंढरपूर प्रवास वाखाणण्याजोगा आहे,

अर्थात तिच्या बरोबर असते तिची प्राण सखी आपली धनु... 

शामिता कडून कुठलीही तक्रार ऐकू येत नाही उलट पक्षी ती appreciate करते तुम्हाला नेहमी.. खूप जास्त...

मोठे मन करून समोरच्याचे कौतुक करायला तितकेच मोठे मन हवे, ते शमिता कडे आहे... 

अशी नाजूक, सालस, लोभस आणि pure soul शमिता Pedalwali family ला लाभली ह्यातच  खूप खूप समाधान आहे...

पुणे तो यवत

पुणे ते पवना dam

आणि मग पुणे ते Gate way of India night ride 

आणि आता आपली ही devotional ride

पुणे ते पंढरपूर वारी..

ह्या वयात असा उत्साह, अशी ऊर्जा आणि तेही हसत खेळत ..

Hats off to u dear, 

रूम मध्ये गेल्यावर शमिताला मी विचारले, कशी आहेस ? 

कशी झाली राईड?

कुठलीही complaint even उन्हाची तीव्रता होती तरीही शमिता हलके smile देत म्हणाली, " छान झाली राईड, मस्त आहे मी"

काय सांगू माऊली मला तुझ्यात साक्षात रकुमाई दिसली 🙏🏼

साक्षात दंडवत प्रणाम ह्या कृष्णामाईला..

असेच सोबत राहू कायम...

पांडुरंग हरी

वासुदेव हरी


आरती चव्हाण

Comments

Popular posts from this blog

Photo of the week - 23/Jun/25 - 29/Jun/25

 Theme: Greenery / Monsoon Flowers Special Mentions

पेडलवारी २०२३ - सचिन गुल्हाणे

सायकल वारी -ओढ पांडुरंगाची खर तर सायकल वारी करण्याची इच्छा बरेच वर्ष होती, २ उद्दिष्ठ होती माऊलीचे एक वेगळ्या प्रकारे दर्शन घेणे  आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करणं बरीच आव्हान आणि समस्या असणार होत्या, राईडच्या अगोदर घरून परवानगी ( खरंच) मिळवणं मोठ आव्हान होत, ऑफिस वेळ सांभाळता मोठया राईड चा सराव झाला नव्हता आणि मुख्य म्हणजे दुपारी उनात राईड करण्याचा सराव अगदीच नव्हता... फक्त एकच जमेची बाजू होती,  माऊलीच्या दर्शनासाठी सायकल ने जाणे ही प्रबळ इच्छाशक्ती .  सोबतच्या ४ मित्रांना जे नेहमीचे सायकलपटू नाहीत त्यांना पण पटवून राईड ला घेऊन जाणार होतो, त्याच एक वेगळच दडपण होत. निघायच्या २ दिवस आधी त्यातील २ लोकांनी व्ययक्तिक कारणांनी नकार दिला आणि दडपण अजूनच वाढले, श्री आणि सौ राठोड नेहमी प्रमाणे उत्साहात तयार होते. आधल्या दिवशी बॅग ड्रॉप साठी मी सारंग ला माझे घर सूचित केले होते, बऱ्याच लोकांना ते माहिती असल्यामुळे मदत होईल हा त्यामागचा उद्देश. संध्याकाळचे कॉल्स थोडे उशिरा घेत ४२ बॅग्स जमा केल्या आणि अद्वैत च्या गाडीत व्यवस्थित लावल्या. यात खरा तर अपेक...

पेडलवारी २०२३ - राजीव अक्षय आणि रणबीर

Dream come true! Sharing a dream come true incident from our cycle wari. सायकल वारी करत पंढरपूरला जायचं म्हणजे सगळं लक्ष दोनशे किलोमीटर पेक्षा जास्त सायकल कशी चालेल, काय होईल ह्याचाच वर लक्ष केंद्रित होत। पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन पण घ्यायचे हे पण अर्थात मनात होतच।  सायकलची वारी पूर्ण केल्यानंतर, रात्रीचे जेवण झाल्यानंतर आणि सायकल डिपॉझिट केल्यानंतर साधारण रात्रीचे साडेदहा झाले होते, आणि आम्ही विचार केला की देवळात दर्शनाला आत्ताच जाऊ।  भक्त निवासातून निघताना कोणी सांगितलं की देऊळ आता बंद झाला असेल, पण अक्षय म्हणायला नाही आत्ताच जाऊया आणि आम्ही गेलो।  मंदिराच्या बोळीत शिरल्यानंतर एकाने सांगितलं की मंदिर आता बंद झाला आहे दर्शन होणार नाही, तरी आम्ही मंदिरापर्यंत गेलो आणि बाहेरूनच नमस्कार केला।  त्यानंतर आम्ही मंदिराची प्रदक्षिणा घालायचा विचार केला आणि प्रदक्षिणा घालताना बाहेर एक फुलवाला म्हणायला की साहेब दर्शन चालू आहे आत्ताच लगेच जाऊन या।  आम्ही संधीचा सदुपयोग करून लगेच गेलो आणि आम्हाला चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात जायचा आणि विठोबाच्या चरणी डोकं ठेवायचा once in a...