Skip to main content

पेडलवारी २०२३ - मकरंद काळे

मी मागच्या वर्षी काही कारणाने राईड पूर्ण करू शकलो नव्हतो. त्यामुळे या वर्षी पूर्ण राईड करायचीच असे ठरवले होते. 


आपल्या Riding buddies बरोबर राईड करताना एक positive energy नकळत मिळत असते हे मात्र खरे! या साठी प्रॅक्टिस राईड arrange करणारे अनंत कुलकर्णी आणि प्रसाद दिवाकर यांना विशेष धन्यवाद! 

शेवटचे ४० किमी कधी एकदा संपतील असे झाले होते.  पण आपल्या Comfort Zone बाहेर जाऊन काही मिळवण्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही! अगदी Cloud 9 फिलिंग आले. आणि आजच्या परतीच्या प्रवासातील गमती जमती मुळे कालचा सगळा थकवा पळून गेला. 



विठ्ठल दिसायला आपल्याकडे ती दृष्टी पाहिजे, (चर्म चक्षु नव्हेत). 

वारकऱ्याला कदाचित पाणी देणाऱ्या मध्ये विठ्ठल दिसला असेल 🙏

कालच्या राईड मध्ये शेवटच्या टप्प्यात असताना Hydration Support ची गाडी आमच्या साठी स्वतःहून थांबली व आम्हाला पाणी दिले. (मी, अभिषेक, प्रेरणा, धनश्री आणि अमोल असे पाच जण होतो आम्ही!) 

पाणी पिऊन झाल्यावर सहजच बहुतेक प्रेरणाच्या तोंडून उद्गार निघाले....अगदी विठ्ठला सारखे धाऊन आलात पाणी पाजायला! भाव तेथे देव! 

माऊली! माऊली! 🙏🙏

सारंग भिडे, आरती चव्हाण आणि राहुल गोरे तुमचे आणि सर्व कोअर टीम मेंबर्सचे मनःपूर्वक आभार! 🙏

I would also like to mention Adwait Palnitkar and महागुरू Aditya Kondejkar for their timely support ❤️🙏



Comments

Popular posts from this blog

Photo of the week - 23/Jun/25 - 29/Jun/25

 Theme: Greenery / Monsoon Flowers Special Mentions

पेडलवारी २०२३ - सचिन गुल्हाणे

सायकल वारी -ओढ पांडुरंगाची खर तर सायकल वारी करण्याची इच्छा बरेच वर्ष होती, २ उद्दिष्ठ होती माऊलीचे एक वेगळ्या प्रकारे दर्शन घेणे  आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करणं बरीच आव्हान आणि समस्या असणार होत्या, राईडच्या अगोदर घरून परवानगी ( खरंच) मिळवणं मोठ आव्हान होत, ऑफिस वेळ सांभाळता मोठया राईड चा सराव झाला नव्हता आणि मुख्य म्हणजे दुपारी उनात राईड करण्याचा सराव अगदीच नव्हता... फक्त एकच जमेची बाजू होती,  माऊलीच्या दर्शनासाठी सायकल ने जाणे ही प्रबळ इच्छाशक्ती .  सोबतच्या ४ मित्रांना जे नेहमीचे सायकलपटू नाहीत त्यांना पण पटवून राईड ला घेऊन जाणार होतो, त्याच एक वेगळच दडपण होत. निघायच्या २ दिवस आधी त्यातील २ लोकांनी व्ययक्तिक कारणांनी नकार दिला आणि दडपण अजूनच वाढले, श्री आणि सौ राठोड नेहमी प्रमाणे उत्साहात तयार होते. आधल्या दिवशी बॅग ड्रॉप साठी मी सारंग ला माझे घर सूचित केले होते, बऱ्याच लोकांना ते माहिती असल्यामुळे मदत होईल हा त्यामागचा उद्देश. संध्याकाळचे कॉल्स थोडे उशिरा घेत ४२ बॅग्स जमा केल्या आणि अद्वैत च्या गाडीत व्यवस्थित लावल्या. यात खरा तर अपेक...

Photo of the week - 05/May/25 - 11/May/25

Theme: Monuments, Historical Sites Special Mention