Skip to main content

पेडलवारी २०२३ - मीनल अभ्यंकर

 19 km वारी चे, पांडुरंग भेटीचे...

पंढरपूर वारी ह्या वर्षी करायची त्या दृष्टीने पहिल्या पासून सराव केला. गेल्या वर्षी वारी केल्या मुळे मला रस्त्याचा अंदाज होता त्यामुळे मनात विश्वास होता संपवण्याचा.....

पण म्हणतात ना देव परीक्षा बघतो त्या शिवाय भेट होत नाही. पुणे ते टेंभुर्णी उत्तम साथ दिली पायाने कितीही ऊन असल तरी..पण 40 km टेंभुर्णी ते पंढरपूर म्हणजे मनाची परीक्षा असल्या सारखे भासले..

इथपर्यंत आपण आलो मग आता हे का अवघड जातय अस मनाला सारखं सलत होत.त्याला कारण होत ऊन, वारा, छोट्या रस्त्यामुळे अंगाला चिकट तून जाणारी वाहन.. ह्या मुळे मनावर खूप दडपण आलं..जे हायवे वर न्हवात....

काहीतरी नक्की वेगळं होत ज्यामुळे मन पांडुरंगा पर्यंत पोचत होत पण शरीर साथ देत न्हवत..मग ठरवलं की थोड वेळ लागला तरी चालेल पण पूर्ण करायचं.. 

40 मधले निम्मे अंतर वर रायडर्स भेटले, मधे पाणी ब्रेक घेतला..पण जेव्हा 19 km cha बोर्ड बघितला वाटलं अजून का नाही संपते, थोडा वेळ मी चक्क रस्त्यावर बाजूला बसले, Enerzal प्याले.

मला 2 गाडीवरून जाणारी माणसं भेटली. मला म्हणाले हळू हळू करा पण जमेल तुम्हाला नक्की. आज ऊन वारा जरा जास्त आहे..पुण्याहून इत पर्यंत तर आलात..आता शेवट चे काही अंतर आहे. 

काही प्रश्न विचारू लागली...कारण त्यांना उत्सुकता वाटली....आपल्या वारीचे उद्दिष्ट काय..किती जण आहात..किती वेळ लागला..अस दर वर्षी करता का...

तेव्हा मी सांगितलं की हो आम्ही सायकल वारी दर वर्षी करतो. जसे वारकरी लोक चालून करतात तसे.....

मग मला जाणवलं की पायी करणं तर किती अवघड असते मग मला सायकल ने का नाही jamu शकत.......तेव्हा जरा मनाला उभारी आली आणि पुन्हा सायकल हातात घेऊन शेवटचे 19 km पुर्ण केले..

प्रत्यय आला की शेवटी कितीही शरीराने कणखर असलो तरी मनाने सुद्धा कणखर असावे लागते.पांडुरंगाला भेटीची ओढ खेचून नेत होती..रस्त्यावर धावणारी मुले, हाथ ल tali वाजवत जणू काही स्वागत करत होती.आणि एक एक km अंतर संपत होते.....

मग काय पंढरपूर च 0 km cha बोर्ड बघून आनंद झाला..😀.....मी स्वतःहून काही नाही केले सर्व काही पांडुरंगाने केले.

त्याला साष्टांग दंडवत🙏🏻



म्हणून माझ्या राईड मध्ये ते 19 km खूप प्रेरणादायी होते..

त्याच्या अलीकडे मी वेगळी होती आणि त्याच्या पलीकडे मी विठ्ठल ची झाले होते. 






🙏🏻विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल 🙏🏻

अशीच वारी दर वर्षी होवो, आणि आमची शरीराची आणि मनाची ताकद वाढो हीच देवापुढे प्रार्थना🙏🏻🙏🏻🙏🏻



Comments

Popular posts from this blog

Photo of the week - 23/Jun/25 - 29/Jun/25

 Theme: Greenery / Monsoon Flowers Special Mentions

पेडलवारी २०२३ - सचिन गुल्हाणे

सायकल वारी -ओढ पांडुरंगाची खर तर सायकल वारी करण्याची इच्छा बरेच वर्ष होती, २ उद्दिष्ठ होती माऊलीचे एक वेगळ्या प्रकारे दर्शन घेणे  आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करणं बरीच आव्हान आणि समस्या असणार होत्या, राईडच्या अगोदर घरून परवानगी ( खरंच) मिळवणं मोठ आव्हान होत, ऑफिस वेळ सांभाळता मोठया राईड चा सराव झाला नव्हता आणि मुख्य म्हणजे दुपारी उनात राईड करण्याचा सराव अगदीच नव्हता... फक्त एकच जमेची बाजू होती,  माऊलीच्या दर्शनासाठी सायकल ने जाणे ही प्रबळ इच्छाशक्ती .  सोबतच्या ४ मित्रांना जे नेहमीचे सायकलपटू नाहीत त्यांना पण पटवून राईड ला घेऊन जाणार होतो, त्याच एक वेगळच दडपण होत. निघायच्या २ दिवस आधी त्यातील २ लोकांनी व्ययक्तिक कारणांनी नकार दिला आणि दडपण अजूनच वाढले, श्री आणि सौ राठोड नेहमी प्रमाणे उत्साहात तयार होते. आधल्या दिवशी बॅग ड्रॉप साठी मी सारंग ला माझे घर सूचित केले होते, बऱ्याच लोकांना ते माहिती असल्यामुळे मदत होईल हा त्यामागचा उद्देश. संध्याकाळचे कॉल्स थोडे उशिरा घेत ४२ बॅग्स जमा केल्या आणि अद्वैत च्या गाडीत व्यवस्थित लावल्या. यात खरा तर अपेक...

पेडलवारी २०२३ - राजीव अक्षय आणि रणबीर

Dream come true! Sharing a dream come true incident from our cycle wari. सायकल वारी करत पंढरपूरला जायचं म्हणजे सगळं लक्ष दोनशे किलोमीटर पेक्षा जास्त सायकल कशी चालेल, काय होईल ह्याचाच वर लक्ष केंद्रित होत। पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन पण घ्यायचे हे पण अर्थात मनात होतच।  सायकलची वारी पूर्ण केल्यानंतर, रात्रीचे जेवण झाल्यानंतर आणि सायकल डिपॉझिट केल्यानंतर साधारण रात्रीचे साडेदहा झाले होते, आणि आम्ही विचार केला की देवळात दर्शनाला आत्ताच जाऊ।  भक्त निवासातून निघताना कोणी सांगितलं की देऊळ आता बंद झाला असेल, पण अक्षय म्हणायला नाही आत्ताच जाऊया आणि आम्ही गेलो।  मंदिराच्या बोळीत शिरल्यानंतर एकाने सांगितलं की मंदिर आता बंद झाला आहे दर्शन होणार नाही, तरी आम्ही मंदिरापर्यंत गेलो आणि बाहेरूनच नमस्कार केला।  त्यानंतर आम्ही मंदिराची प्रदक्षिणा घालायचा विचार केला आणि प्रदक्षिणा घालताना बाहेर एक फुलवाला म्हणायला की साहेब दर्शन चालू आहे आत्ताच लगेच जाऊन या।  आम्ही संधीचा सदुपयोग करून लगेच गेलो आणि आम्हाला चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात जायचा आणि विठोबाच्या चरणी डोकं ठेवायचा once in a...