आम्ही पंढरीचे सायकलकरी!
(स्वयंसेवकांच्या नजरेतून)
घडली हातून सेवा, सफल झाली सायकल वारी,
सायकल स्वारांच्या चेहऱ्यावर खळखळून हास्य फुलल्यावरी !
ह्याच साठी तर केला होता अट्टाहास, व्हावी आपली सायकल वारी एकदम खास,
सायकल स्वारांनी नाही सोडला धीर, अन् घाम गाळला तासन् तास!
मावळ्यांनी लढवली खिंड जोशात, नाही पडून दिली कमतरता कोणत्याही प्रयत्नात,
झोकून दिले सर्वस्व लढवय्या महिला सायकल स्वारांनी,
जणु उजळून उठली पंढरी त्यांच्या पराक्रमात !
नसतेच जर सायकलस्वार उत्साही, काय अर्थ त्या नियोजनाला,
जिद्दी होते सायकलस्वार म्हणून तर अती उत्साह होता आयोजनाला !
विठ्ठलाच्या दारी एकच विनवणी, आरोग्य नांदो घरोघरी,
सुख समृद्धी घेऊन येत राहो, वर्षानुवर्षे आपली सायकल वारी !
~ रुपेश पाटोळे
#themavalathletesassociation

Comments