वारीतले भारी लोक
ये दोस्ती हम नही छोडेंगे...
तोडेंगे दम मगर,
तेरा साथ ना छोडेंगे...
एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल की मी कोणाविषयी बोलत आहे?
हे वीर आहेत प्रसाद दादा आणि अनंत दादा.
उत्कृष्ट लीडरशिप, मनमिळाऊ स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची कला, मोटिवेशन चे सरताज, आणि पेडलवाली चे ग्रेट स्ट्रॉंग लीडर्स...
एरव्ही वडिलांमुळे मुलं ग्रुप जॉईन करतात इथे मुलामुळे प्रसाद दादाने ग्रुप जॉईन केला.
झाले असे की आदित्यला आठवी मध्ये असताना मुंबई नाईट राईड करायची होती. आदित्य आरती काकू वरून आता आरती ताई वर आला होता आणि खूप रिक्वेस्ट करत होता त्याचा कॉन्फिडन्स पाहून आम्ही त्याला हो म्हटले.
मग पेडलवालीच्या मुख्य मीटिंगमध्ये प्रसाद दादा आणि आदित्यची आई भेटली, आदितीच्या आईने माझ्यावर विश्वास ठेवून "तुम्ही आहात ना मग मला चिंता नाही"
असे म्हटल्यावर आदित्यचा मात्र आनंद गगनात मावला नाही. आणि अशा तऱ्हेने हा प्रवास सुरू झाला.
हळूहळू प्रसाद दादा ग्रुप मध्ये यायला लागला आणि बघता बघता हा स्ट्रॉंग सायकलिस्ट स्ट्रॉंग लीडर म्हणून उदयास आला..
आता बोलूया एका हॅप्पी मॅन विषयी.. कायम चेहऱ्यावर हसू, अतिशय आनंदी प्रसन्न असं व्यक्तिमत्व आणि नावाप्रमाणे अगदी सार्थ करणारे त्याचं कॅरेक्टर , सर्वांत अवडेलेला गुण म्हणजे समोरच्याचे कौतुक करणे, अगदी मनापासून gratitude असणारा, अनंत प्रेम आणि दया भाव असणारा ,
असा pure soul म्हणजे आपला अनंत दादा.
एका आयटी कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर असूनही त्याने पेडलवाली मध्ये आल्यानंतर जे सगळ्यांना आपलं केलं ,ते खरंच वाखानण्याजोगे आहे.
तुम्ही अनंत दादाला पाहिल्यावर कायम प्रसन्नच व्हाल, त्याची मुद्रा, त्याचा presence एक पॉझिटिव्हिटी देऊन जातो.
प्रसाद आणि अनंत अशीही जोडगोळी आता आम्हाला लीडर म्हणून लाभली होती..
पुणे मुंबई राइड असो किंवा पुणे पंढरपूर असो उत्तम प्लॅनिंग आणि त्याचबरोबर एक्झिक्युशन यामध्ये या दोघांचा हात कोणीच पकडू शकत नाही इतक्या बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन excel sheet बनवणे, राईड प्लॅन करणं, त्यानुसार लोकांना घेऊन जाणे, ते पोहोचल्यानंतरही जबाबदारीने त्यांची चौकशी करणे या सगळ्या गोष्टी या दोघांनी उत्तमरित्या सांभाळल्या.
एवढेच नाही तर पुणे मुंबईची 2023 ची राईड सुद्धा सक्सेसफुल या दोघांमुळे झाली.
आता होती डोळ्यासमोर ती पुणे पंढरपूर राईड.
जीव तोडून सगळ्या गोष्टी, सगळं प्लॅनिंग या दोघांनी व्यवस्थित केलं ठरल्याप्रमाणे सगळ्या राईडस् पूर्ण केल्या आणि सक्सेसफुली त्या कम्प्लीट केल्या..
हे दोघं म्हणजे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे पेडलवालीचे मावळे ठरले आणि त्यांच्या रूपाने आम्हाला देखील दोन घरातली माणसे भेटली..
या दोघांचे शतशः आभार..
असेच प्रेम जिव्हाळा कायम राहो ही कृष्णाच्या चरणी प्रार्थना
हरी ओम तत्सत
आरती चव्हाण
अनंत प्रसाद ही भारी जोडी
सायकल वरुनी सतत दौडी
सोबत सर्वाना घेऊन जाणे
वाटेत त्यांची काळजी वाहणे
असा हा यांनी घेतला वसा
सर्वाना वाटे हवाहवासा
मुंबई असो वा पंढरपूर
स्वस्तात करती मस्तच टूर
चित्ताने प्रसन्न चेहरा द्वायीचा
अभिमान असे हा पेडलवालीचा 🙏
श्रीरंग अवधानी
मी आत्ता पर्यंत खूप मोटरसायकलिंग केलं आहे. त्यात खूप सारे ग्रुप जॉईन केले आणि सोडले ही. त्यामुळे जेव्हा सायकलिंग सुरू केलं तेव्हा ही ग्रुप नकोच म्हणलं. अमोल कडून Pedalwali बद्द्ल खूप ऐकलं होत, आम्ही सज्जनगड राईड केली तेव्हा एक फोन आला. एक जण खूप काळजीने विचारत होता सगळं व्यवस्थित झालं ना कुणाला काही त्रास नाही ना वगैरे... तो माणूस होता अनंत दादा (अनदा) 😊.
तेव्हा पासून या ग्रुप ची ओढ लागली, आणि पहिल्यांदा आल्या आल्या अनंत दादा ची भेट घेतली. असं वाटलं की खूप वर्षा पासून ओळखत आहे याला. 🤗. पहिली राईड केली ती डायरेक्ट नाईट प्रॅक्टिस राईड आणि तिथे भेटला प्रसाद दादा. एकदम बाजीप्रभू... रस्त्यावर आमच्या मधे यायचा कुणाचा दम आहे का ? लगेच जोरात शिट्टी...
त्या राईड नंतर कळलं आमचा अमोलला इकडचं एवढं वेड का लागलं आहे... हे फक्त लीडर नाही आता आमचे काळजीवाहू मोठे भाऊ आहेत त्यामुळे चला म्हणायची बाकी आम्ही चाललो विना काळजी..
दादा लोकांसाठी भरपूर ताकत आणि प्रेम. 💪🤗
विशाल गुरव
सायकल घे ल्येका आणि चालव हे वाक्य विशाल चे... 😊 २००१ नंतर सायकल हातात घेतली आणि पुणे ते सातारा मारली😊 ..तुला pedalwali ग्रुप वर add करतो, मस्त आहेत लोक..आणि त्यांचे बघून तुला पण वाटेल की एखादी राईड तरी करून बघावी..हे शब्द अमोल चे आणि भाऊ नी मला add केला 😊
मग प्रसाद दादा आणि अनंत दादा हे दोघे भेटली...तू ये जा रे..होईल हळू हळू सवय...पण मला काय जमतच नव्हते राईड ला यायला..कारण सायकल च नव्हती😂
चलो पंढरपूर..असा जेव्हा घोषणा झाली आणि त्याच्या आधी एवढ्या राईड करायच्या असे वेळापत्रक आले आणि त्या राईड पण नाही जमल्या😊
शेवटी माऊलींचे नाव घेवून निघालोच. पण जिव्हाळ्याची माणसं बरोबर होती आणि प्रसाद दादा आणि अनंत दादा कायम विचारात होते..अमित ok ना..जमतंय रे ये हळू हळू..आणि २०२ किलोमिटर पूर्ण केले पण cramp mule शेवटचे २१ किमी टेम्पो मध्ये आलो..पंढरपूर ला पोचल्यावर पण पहिला फोन आलास का काळजीने येवून विचारपूस करून तू जा सायकल रॅप आम्ही करतो असे सांगणारे प्रसाद दादा, विशाल आणि अनंत दादा🙏
प्रसाद दादाशी शी तर एकदम जवळची ओळख निघाली...पण खरंच एकदम चिरतरुण आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहेत दोघे..आपल्या padelwali ग्रुप चे जय विरू❤️
कुटुंबात कोण मोठे असतील तर कसे निर्धास्त आणि बिनधास्त वाटते..तसे वाटू लागले आहे😊
अमित निगडे
अनंत आणि प्रसाद दोघेही कमाल आहेत..उत्तम व्यक्तिमत्त्व, हसरा चेहरा, सद्येव मदतीला धाव नारे🙏🏻मला दोघांनी सायकल सोबत उत्तम leadership कशी सांभाळायची हे शिकवले. मी खूप भाग्यवान आहे ह्या ग्रुप ची की असे हिरे माझ्या सोबत आहेत रीडिंग ल.रात्री ची राईड असो किंवा पहाटेची त्यांच्या सोबत जाताना अंतर कधी पार करते कळत नाही.
मुंबई, बनेश्वर, वाई, पंढरपूर, लोणावळा, यवत अगदी सहज केलं जाते. ते इतके फास्ट आणि सुसाट आहेत की मी त्यांच्या मागे मागे 😀😆. तरी पण पुढे जाऊन थांबून साथ देतात.खरच महान आहेत दोघे. रीडिंग सोबत, मजा मस्ती चालूच असते😀 माझ्या सायकलिंग मध्ये परिवर्तन आणून दिलं ह्या दोघांनी🙏🏻खूप खूप आभारी आहे मी 🙏🏻
मीनल अभ्यंकर
Very well written, Arati and perfectly summed up ! What Vishal wrote further justified it. I met Anant and Santosh the first time before my GOI ride. They motivated me and gave me some tips......
Later Prasad and Pramod also joined PFF. The group rides were led by them.....
Then came TDH with mass participation. Anant and Prasad planned the long rides very well. The ride to Diveagar was most memorable.
With all these rides, our group bonding improved. The two know the route & terrain very well. During Diveagar ride, Anant gave us an idea of Morba ghat and during Panchgani ride, Prasad told us why Pasarni is so named. This mentally prepared us..
Besides, they would prepare sandwiches or bhel for everyone with the raw material brought by those who volunteered ....
Anant also plays the basuri ( a long flute) melodiously. Fun filled destination rides. Anant is someone you can always approach and he is prompt in providing a solution.
शमिता वागळे

Comments