Skip to main content

पेडलवारी २०२३ - वारीतले भारी लोक - १ - निखिल करपे

 वारीतले भारी लोक..

क्रमांक एक: निखिल करपे

हा अवलिया कधीतरी राईड वर दिसला पण फारशी ओळख नाही झाली..

त्याचे महात्म्य कळले ते घरी, 

अनंत दादा तरी जुना मेंबर , माझ्या घरी kit distribution ला दोघेही जीव तोडून मदत करत होते.

आता उभे राहून लिस्ट check करत निखिल दादा काम करत होता , आत मध्ये अभी ने आणलेली खिचडी वाट बघत होती तर संत महात्मा निखिल बोलले , मी अंघोळ आणि देवपूजा झाल्याशिवाय काहीच खात नाही.. धन्य.. एक मस्त personality भेटली, भारी वाटले... 

आता निखिल as a photographer, एकही जण नसेल ज्याने निखिल ची photography बघून मंत्र मुग्ध झाला नसेल...

सहसा रायडर्स मध्ये चढावर कोणते गिअर टाकायचे, वेगात कोणते टाकायचे, ग्रुप सेट कुठला घ्यायचा, अपग्रेड करून कोणता घ्यायचा अशी चर्चा असते

पण निखिल सारखे काही महाभाग ह्या सगळ्यात न पडता बिना गिअर सायकल वर बिनधास्त फिरतात.. 

आणि या वारीत तर अशा सायकलवर सुद्धा निखिलने उत्तम वेगात हा प्रवास पूर्ण केला. 👌🏼👌🏼

तर आम्हाला भर भरून रस पाजणारा, सगळ्यांना आपलेसे करून घेणाऱ्या निखिलला दंडवत प्रणाम🙌🏻🙏🏼🙏🏼🙏🏼

Thanku for being with us.

-

आरती चव्हाण


Comments

Popular posts from this blog

Photo of the week - 23/Jun/25 - 29/Jun/25

 Theme: Greenery / Monsoon Flowers Special Mentions

पेडलवारी २०२३ - सचिन गुल्हाणे

सायकल वारी -ओढ पांडुरंगाची खर तर सायकल वारी करण्याची इच्छा बरेच वर्ष होती, २ उद्दिष्ठ होती माऊलीचे एक वेगळ्या प्रकारे दर्शन घेणे  आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करणं बरीच आव्हान आणि समस्या असणार होत्या, राईडच्या अगोदर घरून परवानगी ( खरंच) मिळवणं मोठ आव्हान होत, ऑफिस वेळ सांभाळता मोठया राईड चा सराव झाला नव्हता आणि मुख्य म्हणजे दुपारी उनात राईड करण्याचा सराव अगदीच नव्हता... फक्त एकच जमेची बाजू होती,  माऊलीच्या दर्शनासाठी सायकल ने जाणे ही प्रबळ इच्छाशक्ती .  सोबतच्या ४ मित्रांना जे नेहमीचे सायकलपटू नाहीत त्यांना पण पटवून राईड ला घेऊन जाणार होतो, त्याच एक वेगळच दडपण होत. निघायच्या २ दिवस आधी त्यातील २ लोकांनी व्ययक्तिक कारणांनी नकार दिला आणि दडपण अजूनच वाढले, श्री आणि सौ राठोड नेहमी प्रमाणे उत्साहात तयार होते. आधल्या दिवशी बॅग ड्रॉप साठी मी सारंग ला माझे घर सूचित केले होते, बऱ्याच लोकांना ते माहिती असल्यामुळे मदत होईल हा त्यामागचा उद्देश. संध्याकाळचे कॉल्स थोडे उशिरा घेत ४२ बॅग्स जमा केल्या आणि अद्वैत च्या गाडीत व्यवस्थित लावल्या. यात खरा तर अपेक...

पेडलवारी २०२३ - राजीव अक्षय आणि रणबीर

Dream come true! Sharing a dream come true incident from our cycle wari. सायकल वारी करत पंढरपूरला जायचं म्हणजे सगळं लक्ष दोनशे किलोमीटर पेक्षा जास्त सायकल कशी चालेल, काय होईल ह्याचाच वर लक्ष केंद्रित होत। पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन पण घ्यायचे हे पण अर्थात मनात होतच।  सायकलची वारी पूर्ण केल्यानंतर, रात्रीचे जेवण झाल्यानंतर आणि सायकल डिपॉझिट केल्यानंतर साधारण रात्रीचे साडेदहा झाले होते, आणि आम्ही विचार केला की देवळात दर्शनाला आत्ताच जाऊ।  भक्त निवासातून निघताना कोणी सांगितलं की देऊळ आता बंद झाला असेल, पण अक्षय म्हणायला नाही आत्ताच जाऊया आणि आम्ही गेलो।  मंदिराच्या बोळीत शिरल्यानंतर एकाने सांगितलं की मंदिर आता बंद झाला आहे दर्शन होणार नाही, तरी आम्ही मंदिरापर्यंत गेलो आणि बाहेरूनच नमस्कार केला।  त्यानंतर आम्ही मंदिराची प्रदक्षिणा घालायचा विचार केला आणि प्रदक्षिणा घालताना बाहेर एक फुलवाला म्हणायला की साहेब दर्शन चालू आहे आत्ताच लगेच जाऊन या।  आम्ही संधीचा सदुपयोग करून लगेच गेलो आणि आम्हाला चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात जायचा आणि विठोबाच्या चरणी डोकं ठेवायचा once in a...