Skip to main content

पेडलवारी २०२३ - प्रांजली खडसे - धांडे

माझी पंढरपुर सायकल वारी!!!

दिनांक : १०/०६/२०२३

माझी वारी, आत्त्म संवादाची. आत्मं चिंतनाची.

सकाळी ४ वाजता अगदी उत्साहात वारीला सुरुवात केली,

बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ,तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.....या जय घोषात.

ध्येय,संकल्प एकच विठू माऊलीचे दर्शन.

हडपसरच्या थोड पुढे गेले तर माझ्या सायकल बडी ला माघारी फिरावे लागले....इतर लोक पुढे निघून गेलेले....मग खऱ्या अर्थाने आत्म संवाद चालू झाला....डोक्यात विचारांचे काहूर....पण सर्वांवर मात करत  निश्चय केला आणि परत सायकल चालवायला लागले, मग होती खरी परीक्षा, तळपणारा सूर्य आणि तापलेली वाट,अनेकानेक चढ आणि उतार....

हा खेळ किमान ४ ते ५ तास चालू होता...पाणी मिळालं की हात....ग्लोव्हज ओले करावेत ,पाणी प्यावं ,जमलच तर केळ खाव नी चालत राहावं.....मग जेवणाच्या ठिकाणी दुपारी १ ला पोहोचले..... हुश्श १६० किलोमीटर चा मोठा टप्पा पार झालेला....

आताशी फक्त ७० की मी.तर राहिले, अस वाटून गेलं खर....पण तीच खरी गंमत होती.....टेंभुर्णी पार केल्यावर पंढरपूर फाटा दिसला ....पण तो होता दोन पदरी रस्ता....जोरदार हेड विंड आणि बाजूने ट्रक गेला की हलणारी सायकल.....हळूहळू चढत जाणारी वाट.... कित्ती पेडल मारतोय ,पण हे काय अजून १ च किमी आलो आपण???

इथेच खरा कस लागणार हे जाणवले....माऊलीचे अभंग लावले आणि परत चालू.....सोबतचे काही सायकलस्वार थकून सपोर्ट वेहिकल मध्ये बसताना पाहिले नी वाटल.....जाऊया का?

आलो ना इथपर्यंत...पण अगदी ४० नी २०  की मी राहिलेले असताना कशाला हा विचार आला रे देवा...नको....मी माझा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा निश्चय पक्का केला.... सोबतीचा पण माझा निश्चय पाहून माझ्या सोबत पेडल करू लागला ....रात्र झाली....परत सुरक्षित पोहोचण्यासाठी सगळी तयारी....परत पेडल.....आणि हो हो दिसली ती विठोबाची उंचच उंच मूर्ती......सगळे श्रम संपले.....आनंद गगनात मावेना.....

मग पंढरपूर ४ की मी..... चंद्रभागेच्या पुलावरून जातांना....काय तो आनंद....हो मी केलं...माझाच मला अभिमान....मी २२५ की मी अंतर पार केलं.....मग त्या चंदनाची उटी लावलेल्या विठोबाच्या चरणावर डोकं ठेवताना.... साजिऱ्या रखुमाईचे दर्शन घेताना...सगळ विसरायला झालं.....

याच साठी केला होता अट्टाहास!!!!!

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची....... नाद घोष चालू झाला.....माऊली माऊली......माझी वारी पूर्ण झाली!!!!!सगळी विठोबा+रखुमाईची कृपा:-)


डॉ. प्रांजली खडसे - धांडे




Comments

Niteen Barhate said…
Well scripted Dr ma'am ji
Jaswandi said…
Well scripted Pranjali. You are a strong rider
माऊली माऊली!🙏🙏

Jyotika said…
Very well written 👏👏Congratulations on this Amazing achievement!

Popular posts from this blog

Photo of the week - 23/Jun/25 - 29/Jun/25

 Theme: Greenery / Monsoon Flowers Special Mentions

पेडलवारी २०२३ - सचिन गुल्हाणे

सायकल वारी -ओढ पांडुरंगाची खर तर सायकल वारी करण्याची इच्छा बरेच वर्ष होती, २ उद्दिष्ठ होती माऊलीचे एक वेगळ्या प्रकारे दर्शन घेणे  आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करणं बरीच आव्हान आणि समस्या असणार होत्या, राईडच्या अगोदर घरून परवानगी ( खरंच) मिळवणं मोठ आव्हान होत, ऑफिस वेळ सांभाळता मोठया राईड चा सराव झाला नव्हता आणि मुख्य म्हणजे दुपारी उनात राईड करण्याचा सराव अगदीच नव्हता... फक्त एकच जमेची बाजू होती,  माऊलीच्या दर्शनासाठी सायकल ने जाणे ही प्रबळ इच्छाशक्ती .  सोबतच्या ४ मित्रांना जे नेहमीचे सायकलपटू नाहीत त्यांना पण पटवून राईड ला घेऊन जाणार होतो, त्याच एक वेगळच दडपण होत. निघायच्या २ दिवस आधी त्यातील २ लोकांनी व्ययक्तिक कारणांनी नकार दिला आणि दडपण अजूनच वाढले, श्री आणि सौ राठोड नेहमी प्रमाणे उत्साहात तयार होते. आधल्या दिवशी बॅग ड्रॉप साठी मी सारंग ला माझे घर सूचित केले होते, बऱ्याच लोकांना ते माहिती असल्यामुळे मदत होईल हा त्यामागचा उद्देश. संध्याकाळचे कॉल्स थोडे उशिरा घेत ४२ बॅग्स जमा केल्या आणि अद्वैत च्या गाडीत व्यवस्थित लावल्या. यात खरा तर अपेक...

Photo of the week - 05/May/25 - 11/May/25

Theme: Monuments, Historical Sites Special Mention