माझी पंढरपुर सायकल वारी!!!
दिनांक : १०/०६/२०२३
माझी वारी, आत्त्म संवादाची. आत्मं चिंतनाची.
सकाळी ४ वाजता अगदी उत्साहात वारीला सुरुवात केली,
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ,तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.....या जय घोषात.
ध्येय,संकल्प एकच विठू माऊलीचे दर्शन.
हडपसरच्या थोड पुढे गेले तर माझ्या सायकल बडी ला माघारी फिरावे लागले....इतर लोक पुढे निघून गेलेले....मग खऱ्या अर्थाने आत्म संवाद चालू झाला....डोक्यात विचारांचे काहूर....पण सर्वांवर मात करत निश्चय केला आणि परत सायकल चालवायला लागले, मग होती खरी परीक्षा, तळपणारा सूर्य आणि तापलेली वाट,अनेकानेक चढ आणि उतार....
हा खेळ किमान ४ ते ५ तास चालू होता...पाणी मिळालं की हात....ग्लोव्हज ओले करावेत ,पाणी प्यावं ,जमलच तर केळ खाव नी चालत राहावं.....मग जेवणाच्या ठिकाणी दुपारी १ ला पोहोचले..... हुश्श १६० किलोमीटर चा मोठा टप्पा पार झालेला....
आताशी फक्त ७० की मी.तर राहिले, अस वाटून गेलं खर....पण तीच खरी गंमत होती.....टेंभुर्णी पार केल्यावर पंढरपूर फाटा दिसला ....पण तो होता दोन पदरी रस्ता....जोरदार हेड विंड आणि बाजूने ट्रक गेला की हलणारी सायकल.....हळूहळू चढत जाणारी वाट.... कित्ती पेडल मारतोय ,पण हे काय अजून १ च किमी आलो आपण???
इथेच खरा कस लागणार हे जाणवले....माऊलीचे अभंग लावले आणि परत चालू.....सोबतचे काही सायकलस्वार थकून सपोर्ट वेहिकल मध्ये बसताना पाहिले नी वाटल.....जाऊया का?
आलो ना इथपर्यंत...पण अगदी ४० नी २० की मी राहिलेले असताना कशाला हा विचार आला रे देवा...नको....मी माझा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा निश्चय पक्का केला.... सोबतीचा पण माझा निश्चय पाहून माझ्या सोबत पेडल करू लागला ....रात्र झाली....परत सुरक्षित पोहोचण्यासाठी सगळी तयारी....परत पेडल.....आणि हो हो दिसली ती विठोबाची उंचच उंच मूर्ती......सगळे श्रम संपले.....आनंद गगनात मावेना.....
मग पंढरपूर ४ की मी..... चंद्रभागेच्या पुलावरून जातांना....काय तो आनंद....हो मी केलं...माझाच मला अभिमान....मी २२५ की मी अंतर पार केलं.....मग त्या चंदनाची उटी लावलेल्या विठोबाच्या चरणावर डोकं ठेवताना.... साजिऱ्या रखुमाईचे दर्शन घेताना...सगळ विसरायला झालं.....
याच साठी केला होता अट्टाहास!!!!!
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची....... नाद घोष चालू झाला.....माऊली माऊली......माझी वारी पूर्ण झाली!!!!!सगळी विठोबा+रखुमाईची कृपा:-)
डॉ. प्रांजली खडसे - धांडे


Comments